कोलकाता : (Amitabh Bachchan questions freedom of expression) गुरुवारी दि. 15 डिसेंबर रोजी कोलकाता (Kolkatta) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावत देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या यादीत बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नावाचाही समावेश आहे. महोत्वाच्या उद्धाटनादरम्यान बीग बी म्हणाला,”आजही सिनेमाचा विचार करताना सर्वात आधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मला खात्री आहे इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हे मान्य करेल”, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना अमिताभ म्हणाले, “एखाद्या सिनेमाची निवड करण्याबद्दल सध्या खूप विचार केला जात आहे. चांगल्या दर्जाच्या सिनेमांची निर्मिती होत आहे. पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच हे सिनेमे प्रेक्षकांना सिनेमागृह ते ओटीटी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पाहता येत आहेत. आपण प्रेक्षकांना गृहित धरू शकत नाही. त्यामुळे त्यांना काय पाहायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे”.
कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, जया बच्चन, राणी मुखर्जीसह अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले मत व्यक्त केलं.