मुंबई | शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. आता त्यांनी आज ईदच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. नेटकऱ्यानी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी हटक्या शब्दात रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काय म्हणालेत ते जाणून घेऊयात.
आज देशभरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी होत आहे. मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सगळेजण मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. यात अनेक राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. अनेक राजकीय नेते देखील रमजान ईदच्या शुभेच्छा देत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर सूचक पोस्ट केली आहे.
अमोल केल्हे यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे की, ‘ईदच्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak असं लिहिलं.. “I” लई Important… नाहीतर राजकारणात असलेल्यांना आयची आय आठवेल! E”i”d Mubarak!” अशी पोस्ट खासदार कोल्हे यांनी केली आहे. त्यांच्या या मिश्किल पोस्टवर चाहत्यांनी देखील शुभेच्छा देत आपलं मत मांडलं आहे.