राष्ट्रवादीत नेमकं घडतंय काय? अमोल कोल्हेंनी घेतली अजितदादांची भेट

amol kolhe ajit pawar sharad pawaramol kolhe ajit pawar sharad pawar

मुंबई | Amol Kolhe : शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी गुरूवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अँटीचेंबरमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र, ही भेट मतदारसंघातील विकासकामाबाबत होती, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

नुकतीच अजित पवार गटाकडून लोकसभेतील खासदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले. यात कोल्हे यांचे नाव नव्हते. अमोल कोल्हेंनी आधीच अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र सादर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाला जरी शपथपत्र दिले असले तरी त्यांनी शरद पवार गटाला देखील शपथपत्र देत आपण शरद पवार गटासोबत असल्याचा दावा केला आहे. शरद पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यांना, बैठकांना डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली होती.

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा झाली. मात्र ही भेट फक्त मतदारसंघातील विकास कामांबाबत असल्याचे कोल्हे म्हणाले. तसेच मऊ शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेली अनेक वर्ष पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, इंद्रायणी मेडीसीटी असेल या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अजितदादांनी महत्त्वाची भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे. या प्रकल्पांचा पाठपुरावा आणि इतर प्रकल्पांबाबत चर्चेकरिता ही भेट झाली असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा ही मागणी होणे गरजेचे आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्ही रेल्वे नेटवर्कला शिरूर मतदारसंघ जोडला जाणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी म्हटले.

Sumitra nalawade:
whatsapp
line