“कोणी काहीही म्हणा पण, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु…”; अमोल कोल्हेंचे राज्यपालांसमोर स्पष्टीकरण

पुणे – MP. Amol Kolhe : खेड मध्ये हुतात्मा राजगुरूंच्या (Rajguru) जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी शिवाजी महाराजांच्या गुरुबद्दल वक्तव्य केलं आहे. यावेळी कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वी शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. “समर्थ रामदास यांच्याशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल” असं वादग्रस्त वक्तव्य कोश्यारी यांनी केलं होतं. याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यपालांच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूबद्दल स्पष्टपणे विधान केलं.

“कोणी काहीही म्हणू द्या पण, छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ हेच आहेत.” असं जाहीरपणे खासदार कोल्हे यांनी विधान केलं.

राज्यपाल कोश्यारी हे अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्यात अडकतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती यांना काढलं तर मुंबईकडे पैसाच उरणार नाही आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानीच राहणार नाही’, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावरून त्यांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेची माफी देखील मागितली होती.

Dnyaneshwar: