पातळी घसरली? “मंगळसुत्र चोर गोप्याला आवर नाहीतर…”, मिटकरींचा थेट फडणवीसांना इशारा!

मुंबई : (Amol Mitkari On Gopichand Padalkar) भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या शब्दात खोचक टीका केली. ते म्हणाले, “धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही, ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र डागलं.

दरम्यान, त्यावरून आता सरकारमधील दोन पक्षात वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पडळकरांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, स्वतःला समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्या आणि घरात आणि समाजात कवडीची किंमत नसलेल्या मंगळसुत्र चोर गोप्याला आवर घाला. याला आवर न घातल्यास तुम्हाला आम्हाला आवरणे कठीण होईल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना दिला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षण (Dhangar Reservation) आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. मात्र, त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहिलं नाही. यावर उत्तर देताना पडळकरांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 

धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो. तुमच्या वडिलांनी, भावानं, पुतण्यानं किंवा तुम्ही धनगर समाजाकडं पाहिलं नाही. त्यामुळे धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत, असं म्हणत पडळकरांनी हल्लाबोल केला होता. त्यावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharastra Politics) रान पेटलं आहे.

Prakash Harale: