पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अमोल मिटकरी यांनी इस्लामाबाद येथे पक्षाच्या परिवार संवाद याञेदरम्यान केलेल्या ब्राह्मणविरोधी भाषणाने पुण्यात ब्राह्मण महासंघ चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघानं पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी महासंघाचे प्रमुख अनिल दवे यांनी आपल्या सहकार्यांसह मिटकरींविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते.
आनंद दवे मिटकरींवर टिका करताना म्हणाले, अमोल मिटकरी हे मूर्ख आहेत. ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असं आम्ही म्हणतच नाही. त्यांनी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नव्हतं पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीनं वापरला यावर आमचा आक्षेप आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी वक्तव्य वापरलं आहे हे चुकीचं आहे. या विधानाला आमचा विरोध असल्याचा आरोप दवे यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी स्पष्टीकरण देताना अमोल मिटकरी म्हणाले, माझं भाषण जर पूर्ण ऐकलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही समाजाचा उल्लेख मी केलेला नाही. मी कोणाबद्दलही अपशब्द बोललेलो नाही. मी फक्त एका गावातील कन्यादानाच्या प्रसंगाचं उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला आहे. यामध्ये कोणालाही त्रास होण्याचं कारण नाही. असा आरोप मिटकरी यांनी यावेळी केला आहे.