“आज मैं मूड बना…”, नवीन वर्षात अमृता फडणवीसांचं गाणं येतंय प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई | Amruta Fadnavis – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमी काहीना काही कारणांमुळे चर्चेत येत असतात. त्या नेहमी समाजातील विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसतात. तसंच अमृता फडणवीस या एक उत्तम गायिका देखील आहेत. आत्तापर्यंत त्यांनी गायलेली गाणी प्रेक्षकांच्या चांगलीस पसंतीस पडली आहेत. अशातच आता नवीन वर्षात त्यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येत असून याबाबतची एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘आज मैं मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे’, असे त्यांच्या नवीन गाण्याचे बोल असणार आहेत. तसंच अमृता फडणवीस यांनी त्यांचा नवीन लूकमधील एक फोटो देखील शेअर केला आहे. सध्या त्यांचा हा नवा लूक चांगलाच चर्चेत आहे.

अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं बॅचलर्सवर आधारित असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृता यांचा नवा लूक पाहायला मिळत आहे. जीन्स, टॉप व जॅकेट परिधान करुन ज्वेलरी घातलेला त्यांचा हटके लूक फोटोत पाहायला मिळत आहे. त्यांच्या या लूकमुळे चाहत्यांना त्यांच्या नव्या गाण्याची उत्सुकता लागली आहे.

Sumitra nalawade: