“अब देवेंद्र अकेला नही, सारी…”; राज्यसभेच्या निकालावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया!

मुंबई – Amruta Fadnavis on Rajyasabha Election 2022 | राज्यसभा निवडणुकीचे निकाल लागले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या खेळीमुळे भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा देते. हा सत्याचा विजय आहे. सत्याच्या बाजूने सर्वजण आहेत, याचा आनंद आहे. अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, भाजपच्या स्वतःच्या कर्तृत्वावरील हा निकाल आहे. भाजप काही महाविकास आघाडी नाही, रडीचा डाव खेळायला. शिवसेनेला आता धडे मिळायला सुरुवात होईल, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

RashtraSanchar: