अमृता फडणवीसांनी ‘या’ प्रसिद्ध बाॅलिवूड गायकासोबत गायलेल्या रोमँटिक गाण्याचा व्हिडीओ एकदा बघाच!

मुंबई | Amruta Fadnavis – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. तसंच त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. अमृता अनेकदा त्यांचं मत परखडपणे मांडताना दिसतात. तसंच त्या एक उत्तम गायिका असून आजवर त्यांनी अनेक गाणी गाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आत्ताही त्यांचं एक नवनी रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

अमृता फडणवीसांनी एका नवीन चित्रपटासाठी गाणं गायलं आहे. ‘लव्ह यू लोकतंत्र’ (Love You Loktantra) या चित्रपटातील एक गाणं त्यांच्या आवाजात रेकाॅर्ड करण्यात आलं आहे. ‘धडका दिल’ असं त्यांनी गायलेल्या गाण्याचं नाव आहे. तसंच अमृता यांनी हे गाणं सुप्रसिद्ध बाॅलिवूड गायक शानसोबत (Shaan) गायलं आहे.

अमृता फडणवीसांचं हे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून प्रेक्षकांच्याही ते पसंतीस उतरत आहे. नव्या गाण्याबाबत अमृता फडणवीसांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. “‘लव्ह यू लोकतंत्र’ चित्रपटातील ‘ना जाने क्यू धडका दिल’ हे या वर्षातील सगळ्यात रोमॅंटिक गाणं लोकप्रिय गायक शान यांच्यासह गाताना मजा आली”, असं म्हणत अमृता फडणवीसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. तसंच 14 ऑक्टोबरला ‘लव्ह यू लोकतंत्र’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Sumitra nalawade: