“मंत्र्यांच्या बायकांचं एकमेकींशी जमतं का?” अमृता फडणवीसांचे हटके उत्तर म्हणाल्या…

मुंबई : (Amruta Fadnavis On Lata Shinde) झी मराठीवर सुरु असलेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालनकार प्रसिद्ध अभिनेते असलेले सुबोध भावे करत आहेत. कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्त्वृवान गाजलेल्या महिलांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. या निमित्ताने पहिल्याच भागात खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘बस बाई बस’ या मंचावर हजरी लागली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे या देखील उपस्थित होत्या. अमृता फडणवीस यांनी या वेळी अनेक प्रश्नांची उत्तरे हटके पद्धतीने दिली आहेत. नेते मंडळी कधीही एकत्र पहायला मिळतील पण, नेत्यांच्या पत्नी काही ठराविक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र दिसतात. यावेळी लता शिंदे आणि अमृता फडणवीस यांनी आपल्या खाजगी आयुष्यावर मनमोकळ्या गप्पा मारल्याचे दिसून आले.

या प्रसंगी अमृता यांना एक प्रश्न विचारण्यात आला, दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकत्र जमतं का? या प्रश्नांचे त्यांनी हटके पद्धतीने उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, बहुदा कोणत्याही मंत्र्यांच्या पत्नींला घराबाहेर पडायला पुरेसा वेळचं मिळत नाही. त्या सतत घरच्या काही ना काही कामात मग्न असतात. मात्र एक सांगते की, दोन मंत्र्यांमध्ये अनेक मतभेद असतात, पण दोन मंत्र्यांच्या पत्नींचे एकमेकांशी चांगलं जमतं. त्यांच्या या उत्तारानं मंचावरील अनेकांना हसू आवरता आलं नाही. यावेळी त्यांनी एक गाणं ही गायलं.

Prakash Harale: