राष्ट्रपती भवनाच्या गच्चीवर सापडला ‘ट्रॅकिंग डिव्हाईस’ असलेला गरुड; सुरक्षा रक्षकांत एकूणच खळबळ

representative image

सध्या देशात अनेक ठिकाणी असुरक्षिततेचे वातावरण तयार झालेले आहे. अशातच सोमवारी राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेबाबत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

राष्ट्रपती भवनाच्या गच्चीवरती सुरक्षारक्षकांच्या हाती एक गरुड लागला आहे. त्या गरुडाला ट्रॅकिंग डिव्हाईस बसवलेले असल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर राष्ट्रपती भवनातील सुरक्षारक्षकांमध्ये एकूणच खळबळ उडाली. त्यानंतर तत्काळ तपासणी सुरु करण्यात आली.

दिल्लीमध्ये सोमवारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. पाऊसाचा मारा झाल्यामुळे गरुड राष्ट्रपती भवनाच्या छतावर पडला होता. सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर ते गरुडाजवळ गेले असता त्यांना गरुडाला ट्रॅकिंग डिव्हाईस बसवलेले असल्याचे त्यांनी बघितले. त्यानंतर ते ट्रॅकिंग डिव्हाईस फोरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

Dnyaneshwar: