नवी दिल्ली | Anand Mahindra Request To Nitin Gadkari – देशातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे नेहमी प्रेरणादायी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. आता देखील आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एक मागणी केली आहे. तसंच त्यांनी केलेल्या या मागणीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एका रस्त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमुळे बोगदा तयार झाल्यासारखं दिसत आहे. “मला बोगदे आवडतात पण खरं सांगायचं तर असे नैसर्गिक बोगदे मला जास्त आवडतात.” असं महिंद्रा म्हणाले आहेत. त्याचबरोबर, तुम्ही देशातील ग्रामीण भागात नव्याने तयार करत असलेल्या रस्त्यावर अशा प्रकारचे बोगदे तयार करू शकता का? अशा मागणी त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, देशातील अनेक महत्त्वाचे रस्ते बांधणासाठी नितीन गडकरी यांनी योगदान दिलं आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने बोगदा तयार करण्याची मागणी आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. त्याचाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.