आनंद पिंपळकर यांचा ‘वास्तुशास्त्र’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे | आनंद पिंपळकर यांची पहिली निर्मिती असलेल्या ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाची नुकतीच पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर मनोरंजनाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देश्याने मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल टाकले. तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सक्सेस पार्टीत त्यांनी त्यांच्या ‘वास्तुशास्त्र’ या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे.

या कार्यक्रमावेळी चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या मोशन पोस्टरमध्ये भला मोठा वाडा, कोसळणारा पाऊस, उडणारे पक्षी, कालचक्राची प्रतिकृती आणि भीतीदायक पार्श्वसंगीत ऐकू येत आहे. या मोशन पोस्टरने प्रत्येकाची उत्सुकता वाढवली आहे. फेब्रुवारी 2024 ला ‘वास्तुशास्त्र’ मागचं गूढ उलगडणार आहे. आनंदी वास्तु आणि साईकमल प्रोडक्शन हा चित्रपट प्रस्तुत करीत आहे.

‘आलंय माझ्या राशीला’ या पहिल्या चित्रपटातून राशींच्या गमतीजमती मांडल्यानंतर ‘सत्य कधीही मिटत नाही…!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘वास्तुशास्त्र’ या आगामी चित्रपटातून गूढ रहस्याचा चित्तथरारक अनुभव ते देणार आहेत. ‘वास्तुशास्त्र’ चित्रपटातून कोणाविषयीच्या सत्याची उकल होणार ? याची रोमांचकारी पण तितकीच भयप्रद थरारक कथा पहायला मिळणार आहे.

कार्यक्रमावेळी अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेता मंगेश देसाई, संदीप पाठक, अक्षय वाघमारे, नाटयनिर्माते दिलीप जाधव, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, प्रणव पिंपळकर, संग्राम चौघुले, दिग्दर्शक अजित शिरोळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Dnyaneshwar: