आनंद महिंद्रांनी केलं आदित्य ठाकरे यांचं कौतुक; म्हणाले…

नवी मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एसी इलेक्ट्रॉनिक बसेसची वारंवारता वाढवली असून बस स्टॉप सामान्य नागरिकांसाठी सोयीस्कर करण्याकडे लक्ष दिले आहे . त्यांच्या या कामाचं कौतुक महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आणि उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे . महिंद्रा नवनवीन कल्पना सोशल मीडिया शेयर करत असतात. आता त्यांनी आदित्य ठाकरेच कौतुक करत म्हणाले की , मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. “अखेर मुंबईत वर्ल्डक्लास बस स्टॉप पाहायला मिळणार आहेत. एक्सरसाईझ बार थंड हिरवेगार छत यासारखी नाविन्यपूर्ण गुणवैशिष्ट्ये पाहून खूप चांगलं वाटत आहे. वाह! आदित्य ठाकरे, इक्बाल सिंह चहल,” असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यांच्या या ट्विटनंतर आदित्य ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. “धन्यवाद आनंद महिंद्राजी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आरामदायी आणि डिझाइन दर्जेदार करणे ही त्यामागील कल्पना आहे. त्यामुळे आम्ही एसी वाढवली आहे. दुसरीकडे आम्ही आमचे बस स्टॉप्स नागरिकांसाठी सर्वोत्तम असतील याकडे लक्ष ठेवत आहोत,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Nilam: