…आणि संस्थेचे जाळे विस्तारले

…आणि संस्थेचे जाळे विस्तारू लागले. या संस्थेत पुणे, लोणावळा, मुंबई, कोंढापुरी, सोलापूर अशा विविध शहरांमध्ये एकूण बारा शैक्षणिक संकुले आहेत. संस्थेची जवळपास 85 महाविद्यालये आणि 26 शाळा आहेत. या संस्थेत सात हजारांहून अधिक प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. एकूण 90 हजारांहून अधिक विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत आहेत.

आज सिंहगड शिक्षण संस्थेचा इतका विस्तार झाला आहे. एखाद्या विद्यार्थ्यांने प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला, तर तो अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय किंवा इतर कोणतीही पदवी घेऊन याच शिक्षण संस्थेतून बाहेत पडू शकेल. या संस्थेत व्यवस्थापन, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, वास्तुशास्त्र, आरोग्य विज्ञान यात एमबीबीएस, एमडी, नर्सिंग, फिजिओथेरपी तसेच याव्यतिरिक्त विधी, हॉटेल व्यवस्थापन, कला व वाणिज्य, विज्ञान या विद्याशाखांमध्ये विविध अभ्यासक्रम चालविले जातात. सुमारे 10 हजार लोकांना संस्थेने रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

‘सिंहगड’ची वैशिष्ट्ये
सिंहगड इन्स्टिट्‌‍यूट ही अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेली औद्योगिक क्षेत्राला सुसंगत अभ्यासक्रम चालविणारी आणि दर्जेदार शिक्षण देणारी संस्था आहे. भारत आणि परदेशातील विद्यार्थ्यांना संस्थेत उत्कृष्ट शिक्षण दिले जाते. सिंहगडमधील सर्व संस्था 11 युरोपीय विद्यापीठांबरोबर कार्यरत आहेत. तिथे 42 जणांना फेलोशिप मिळाली आहे.

या विद्यापीठाच्या सहकार्याने ‘सिंहगड’च्या 22 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली आहे. या विद्यापीठाच्या मदतीने त्यांनी परदेशी विद्यार्थी आदान-प्रदान करारही केले आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी आदान-प्रदान आणि 19 आशियाई व युरोपीय विद्यापीठांबरोबर सहकार्य करार केले आहेत. ‘सिंहगड’ची ही पाऊले म्हणजे जागतिक दर्जाकडे सुरू झालेली वाटचाल आहे.

सुसज्ज आणि दर्जेदार सुविधा सिंहगडमध्ये शिक्षणासाठी मूलभूत सुविधा आणि पुस्तके, प्रयोगशाळा आणि क्रीडा सुविधा, सुसज्ज भोजन व्यवस्था आहे. संस्थेच्या प्रत्येक शिक्षण संकुलात स्वतंत्र मोठे ग्रंथालय आहे. याव्यतिरिक्त एक केंद्रीय ग्रंथालय आहे जे अतिशय व्यापक संग्रह, संदर्भ आणि पाठ्यपुस्तके, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मासिके आणि नियतकालिकांनी सुसज्ज आहे. तेथे वाचनासाठी एक मोठा हॉल आहे. तो विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार रात्री उशिरापर्यंत खुला असतो.

‘सिंहगड’च्या सर्व संस्थांच्या परिसरात वायफाय सुविधा उपलब्ध आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे विविध विषयांची माहिती मिळविणे सोपे होते. आधुनिक ऑडिओ व व्हिडीओ उपकरणांनी सुसज्ज गेस्ट लेक्चर आणि सेमिनार आयोजित करण्यासाठी संस्थेत अत्याधुनिक सभागृह उभारले आहे. संस्थेने 2 हजारांहून अधिक आसनक्षमता असलेले ओपन एअर थिएटरही बांधलेले आहे.

मुख्य रंगमंच आणि आधुनिक ध्वनी व प्रकाश यंत्रणेने हे थिएटर सुसज्ज आहे. मोठे सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट कार्यक्रमांचे तेथे आयोजन केले जाते. जगभरातून पदवी घेत असलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य आवश्यक आहे, यासाठी ‘सिंहगड’ने भाषा प्रयोगशाळा स्थापन केली आहे. ‘सिंहगड’च्या विविध परिसरांमध्ये विद्यार्थ्यांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एटीएम काऊंटरद्वारे विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे विस्तार मंडळे सुरू केली आहेत.

विद्यार्थ्यांना सामान्य वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रत्येक कॅम्पसमध्ये ‘क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. ‘सिंहगड’ने कोणत्याही आपत्कालीन गरजांसाठी नामांकित रुग्णालयांशी सहकार्याचे करार केले आहेत. अत्याधुनिक सुविधा असणाऱ्या सर्व कॅम्पसमध्ये वसतिगृह सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक वसतिगृहाची खोली बेड्स, बाथरूम आणि शौचालय यांसह सुसज्ज आहे. सर्व खोल्यांमध्ये टेलिफोन कॉल सुविधा उपलब्ध आहेत.

स्वयंपाक, कपडे धुण्यासाठी अतिरिक्त सुविधादेखील देण्यात आल्या आहेत. सिंहगड संस्थेने विद्यार्थ्यांसाठी एक नावीन्यपूर्ण ‘विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रम’ सुरू केला आहे. जो आवश्यक तांत्रिक विकासासाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याची क्षमता वाढविणे, त्यांना उद्योजकतेसाठी तयार करणे आणि देश-विदेशात उच्चशिक्षण घेण्याची क्षमता विकसित करणे, हा त्यामागील उद्देश आहे.

‘सिंहगड’ने पुणे इंटरनॅशनल इनक्युबेशन सेंटर (पीआयआयसी) आणि व आसरा’ यांच्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे गुण विकसित करण्यासाठी आणि त्यांचे स्वत:चे रोजगार सुरू करण्यास सक्षम करण्यासाठी सहकार्य करार केला आहे. सिंहगड संस्थांच्या उद्योजकता विकास कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांत स्टार्टअप सुरू करण्यास प्रोत्साहित केले आहे.

आईची प्रेरणा, कौटुंबिक सहकार्य कोणत्याही कामात कुटुंबाची साथ मिळत नाही, तोपर्यंत त्यात यश प्राप्त होत नाही. प्रा. नवले यांनाही कुटुंबाची भक्कम साथ लाभली. सर्वप्रथम त्यांच्या आईकडून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या आईने प्रा. नवले यांना वाढवताना खूप संघर्ष केला आणि मुलाला सक्षम केले. प्रा. नवले नेहमीच म्हणतात की, त्यांच्या यशामागील सर्व प्रेरणा आईकडूनच मिळालेल्या आहेत.

त्यांना प्रत्येक टप्प्यावर पत्नी डॉ. सुनंदा नवले यांचीही सक्षम साथ मिळाली. नंतर मुलगा रोहित नवले आणि मुलगी रचना नवले यांनीसुद्धा या कामात हातभार लावला. शिक्षण संस्थेच्या उभारणीचे स्वप्न साकारण्याचे श्रेय प्रा. नवले सर आपल्या कुटुंबीयांना देतात. ते म्हणतात की, मला माझी पत्नी डॉ. सुनंदा नवले यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.

Prakash Harale: