इस्लामाबाद : नव्याने झालेला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ सध्या सौदी अरब दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या चांगालाच व्हायरल होत आहे. शाहबाझ मदिना इथल्या मस्जिद-ए-नवाबीमध्ये प्रवेश करत असताना त्यांना पाहुन लोकांनी चोर-चोर असे नारे देण्यास सुरुवात केली. यामुळं पाकिस्तानचे पंतप्रधान ‘चोर चोर’ असा नारा घुमतोय. त्यानंतर लगेच नारेबाजी करणाऱ्यांना नागरीकांना अटक करण्यात आली.
दरम्यान, पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्या प्रतिनिधी मंडळासह तीन दिवसाच्या अधिकृत सौदी अरब दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत माहिती मंत्री मरियम औरंगजेब आणि राष्ट्रीय संसदेचे सदस्य शाहजैन बुगती यांचाही समावेश आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लोकांनी अशा प्रकारे विरोध करण्याला अप्रत्यक्षपणे इमरान खान जबाबदार असल्याचं मरियम औरंगजेब यांनी म्हटलं आहे. अशी माहिती समोर येत आहे.