“अंगणवाड्या सक्षम करण्यास निधी द्या” आयुष प्रसाद

जेजुरी Jejuri Pune Rural News | अंगणवाडी हा बालकांच्या शिक्षणाचा पाया आहे. जिल्ह्यात ३ लाख २८ हजार मुले अंगणवाडीत शिक्षण घेत आहेत. अंगणवाडी सेविकांनी ३ ते ६ वयोगटातील मुलांच्या गुणवत्ता वाढण्यासाठी भर द्यावा. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने महिला व बालकल्याण विभागाचा १५ व्या वित्त आयोगाचा सर्व निधी अंगणवाडीसाठी खर्च करावा व वाडी वस्ती व गावातील अंगणवाडी दर्जेदार बनवावी असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कोथळे येथे केले.

पुरंदर तालुक्यातील कोथळे येथे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश भोईटे यांच्या विशेष प्रयत्नातून भोसलेमळा अंगणवाडीचे उद्घाटन तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ६ लाख रुपये खर्चाचे रमाई शिम्पीन मंदिराचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, अंगणवाडीतील ३ लाख ११ हजार मुलांच्या आरोग्य तपासणी करून औषध उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात चार हजार सहाशे अंगणवाड्या आहेत. तर ७ हजार ५०० अंगणवाडी सेविका आहेत. प्रत्येक अंगणवाडी सेविकेच्या खात्यात एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जमा करण्यात आला आहे.

जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांचा ग्रामीण भागातील अभ्यास व प्रत्यक्ष अनुभव याद्वारे त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक विकासकामे केली असून, त्यांच्या अनुभवाचा आम्हाला विकास कामांसाठी फायदा होत असल्याचेही आयुष प्रसाद यांनी सांगितले.

यावेळी नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे, पुरंदर तालुका भाजपचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे, महिला व बालकल्याण समितीच्या जिल्हाधिकारी जामसिंग गिरास, गटविकास अधिकारी अमर माने, पुणे रोहयो फळबाग लागवड समितीचे सदस्य राहुल भोसले, सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय भोईटे, कोथळे गावच्या उपसरपंच वंदना जगताप, संदीप जगताप, बाळासाहेब काळाने, आकाश जगताप, तुषार काकडे, धनराज जगताप, विजय जगताप, गोविंद भोसले, अभिजित जगताप, राहुल जगताप, कैलास भोसले, विशाल कुदळे, शांताराम भोसले, सोमनाथ काकडे, गणेश जगताप, प्रमोद जगताप, योगेश दोडके, बबन भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, तर आभार तुषार काकडे यांनी मानले.

Dnyaneshwar: