प्रग्नेंसी न्यूजवर संतापली आलिया; म्हणाली, “मी पार्सल नाही…”

मुंबई | Angry Alia Bhatt On Pregnancy News – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने काल (28 जून) चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या करिअर आणि प्रेग्नेंसी विषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. एका न्यूज पोर्टलने असा दावा केला आहे की, आलियाचं शूटिंग संपल्यानंतर रणबीर तिला न्यायला जाणार आहे. शिवाय, त्यात असंही म्हटलं आहे की आलियाने तिच्या प्रेग्नेंसीची योजना अशा प्रकारे केली आहे की तिच्या प्रोजेक्ट्सवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. हे वाचल्यानंतर आलिया संपातली आहे आणि तिने या न्यूज पॉर्टलला सडेतोड उत्तर दिले आहे.

आलियाने एका वृत्त वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या बातमीचा स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉट शेअर करत आलिया म्हणाली, “यादरम्यान अजूनही काही लोकांना वाटतं की आपण पुरुषप्रधान जगात राहतो…कोणत्याच गोष्टीला उशीर करण्यात आलेला नाही! कोणालाही वेगळा अर्थ घ्यायची गरज नाही. मी एक स्त्री आहे, पार्सल नाही! मला अजिबात आराम करण्याची गरज नाही, पण तुमच्या सगळ्यांकडे डॉक्टर असल्याचे प्रमाणपत्र आहे हे जाणून चांगलं वाटलं. आपण २०२२ मध्ये आहोत, कृपया आपण या जुन्या विचारसरणीतून बाहेर पडू शकतो का? मला माफ करा मला जावं लागेल कारण माझा शॉट रेडी आहे.” तसंच आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

दरम्यान, आधी अशा चर्चा होत्या की शूटींगमध्ये व्यग्र असलेली आलिया लवकरच लंडनवरून मुंबईत येणार आहे. रिपोर्टनुसार असं म्हटलं आहे की जुलैअखेर पर्यंत ‘आलिया रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘हार्ट ऑफ स्टोन’ चे चित्रकरण पूर्ण करणार आहे.

Dnyaneshwar: