राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मविआसाठी दुष्काळात तेरावा!

sharad pawar uddhav thackeray emagesharad pawar uddhav thackeray emage

मुंबई – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरूंगात आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना मतदान करता आलं नाही. मात्र आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मतदान करण्यासाठीची याचिका फेटाळून लावली आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी या दोघांनी कोर्टात धाव घेतली होती. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी कसं गणित जुळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RashtraSanchar:
whatsapp
line