“मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब गजाआड जाईल…”- रवी राणा

मुंबई | Ravi Rana On Anil Parab | परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या संपत्तीवर आज ईडीकडून (ED) छापेमारी (Raid) करण्यात येत आहे. यासंदर्भात आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी कठोर शब्दात अनिल परब यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. Ravi Rana On Anil Parab

यावेळी रवी राणा म्हणाले “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या जवळचा मंत्री मातोश्रीचा (Matoshree) खजिनदार आहे. वाझेच्या माध्यमातून कलेक्शन जमा करून अनिल परब मातोश्रीवर पोहचवत होते. आता या सगळ्याचा फांडाफोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) दिवाळी केली नाही त्यांची दिवाळी परबांमुळे अंधारात गेली. नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यासारख्या एका महिला खासदाराला अनिल परब यांनी जेलमध्ये टाकलं. मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब आज गजाआड जाईल. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे कारनामे लवकरच बाहेर येतील.”

आज सकाळपासून अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. तसंच ईडीने अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल परबांविरोधात ईडीने मनी लाँड्रींग (Money Londring) विरोधात केस दाखल केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Sumitra nalawade: