मुंबई : सर्वांची आवडती मालिका ‘पवित्र रिश्ता’ ही असून या मालिकेमधील अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकतीच लग्नबंधनात आडकली आहे. अंकिताने तिचा प्रियकर विकी जैन सोबत मुंबई येथे थाटामाटात लग्न केलं आहे. त्यानंतर हि जोडी चांगलीच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच अंकिता आणि विकीने स्मार्ट जोडीचे विजेतेपद जिंकलं आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी स्टार प्लस या टीव्ही चॅनेलमधील ऐका शोमध्ये हं ए दोघे दिसले होते. त्या शो चा निकाल लागला असून अंकिता आणि विकी हे दोघे या शो चे स्मार्ट जोडी म्हणून विजेते झाले आहे.
त्यानंतर आता अंकिताने आपल्या इन्स्टाग्रामअकाउंट वरून मिळालेला बक्षीसासोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ शेयर केला आहे. त्या दोघांनी स्मार्ट जोडी या कार्यक्रमात २५ लाख रुपये आणि चमकती ट्रॉफी मिळाली आहे. तसंच त्या व्हिडिओमध्ये अंकिता आणि सोबत अनेक कलाकार देखील आनंद साजरा करत असल्याचं दिसत आहेत. तर अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे दोघेही त्यांना ट्रॉफी देताना दिसत आहेत. विकी आणि अंकिता साठी तो क्षण सगळ्यात आनंदाचा असल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, स्मार्ट जोडी विजेत्या पदकानंतर अंकिताने माध्यमांशी देखील संवाद साधला यात तिने विकीचा कौतुक केलं असून ती म्हणाली की, माझा नवरा विकी हा फार मोठा अभिनेता वगैरे नाही परंतु त्याने मला या शो मध्ये आणि आयुष्यात कायम साथ दिली आहे.तो एक उत्तम आर्टिस्ट आहे हे मला माहित नव्हतं पण या शो दरम्यान समजलं. एक चांगला सोबती म्हणून तो कायम मला साथ देतो यामुळे त्याच मलाही कौतुक आहे.