केजरीवाल दोषी आढळले तर शिक्षा झालीच पाहिजे, जाणून घ्या असं का? म्हणाले अण्णा हजारे

अहमदनगर : (Anna Hajare On Aravind Kejariwal) ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपल्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना त्यावेळी आपण चांगला सल्ला देत होतो. तेव्हा एक दिवस असा गेला नाही की मी त्यांना शुद्ध आचारण ठेवण्याचा सल्ला दिला नाही. तरीही पुढे त्यांनी मार्ग बदलला. आता त्यांच्यावर ही वेळ आली आहे. दिल्ली सरकारच्या मद्य गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करीत आहे. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा झालीच पाहिजे’, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. यामध्ये दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आधीच अटक झाली आहे. आता केजरीवाल यांनाही सीबीआयने चौकशीसाठी बोलाविले आहे. केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या आम आदमी पक्षाची स्थापना हजारे यांच्या आंदोलनातून झाली आहे. त्यावेळी केजरीवाल हे हजारे यांचे शिष्य मानले जात होते.

केजरीवाल यांच्या चौकशीसंबंधी अण्णा हजारे म्हणाले, ‘मी पूर्वीच केजरीवाल यांना एक पत्र लिहिले होते. त्यांना सांगितले होती की हा दारूचा विषय सोडून द्या. दारूमुळे कोणाचेही भले झालेले नाही. पैशासाठी काहीही करणे अयोग्य आहे. चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे,’ असा सल्लाही हजारे यांनी दिला आहे.

Prakash Harale: