ससून रुग्णालयातील अजून एक कारनामा समोर

अधीक्षक यलप्पा जाधव यांची नियुक्ती वादात

Another feat in Sassoon Hospital is aheadAnother feat in Sassoon Hospital is ahead

ससून रुग्णालयातील अजून एक कारनामा समोर

मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये पुण्यातील ससून रुग्णालय खूप चर्चेत आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, कल्याणीनगर पोर्शे कार अपघातातील रक्त नमुना फेरफार, काही दिवस आधी ससूनच्या डॉक्टरने बेवारस रुग्णाशी केलेले अमानवी कृत्य अशी बरीच उदाहरणं सांगता येतील. त्यातच आता ससून रुग्णालयाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. ससूनचे अधीक्षक यलप्पा जाधव यांची नियुक्ती वादात सापडली आहे. जाधव हे सह प्राध्यापक असतानाही त्यांना ससूनचे अधीक्षक बनवण्यात आले आहे. पात्रता नसताना देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमागे जाधव यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? असे प्रश्नही आता उपस्थित होऊ लागले आहे.

ससूनचे अधीक्षक यलप्पा जाधव हे सहप्राध्यापक आहेत. सह प्राध्यापक असताना त्यांना अधीक्षक करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने ८ मे २०२४ रोजी एक जीआर काढला नुसार हॉस्पिटलच्या अधीक्षक पदी एनएमसी गाईडलाईन नुसार प्राध्यापक या पदाची व्यक्ती अधीक्षक असणे गरजेचे आहे. त्यानुसार ससूनसारख्या अतिशय महत्त्वाच्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी गेले दोन महिने होऊन सुद्धा सहप्राध्यापक म्हणजेच असोसिएट प्रोफेसर ही व्यक्ती कार्यरत आहे. एकीकडे सरकार एनएमसी गाईडलाईन्सचा आधार घेऊन जीआर काढते आणि दुसरीकडे पात्रता नसलेली व्यक्ती, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मर्जीतली व्यक्ती, त्या पदावर कार्यरत ठेवते ही गोष्ट ससून रुग्णालय आणि प्रशासनासाठी अतिशय गंभीर गोष्ट आहे.

बेवारस रुग्णाबाबत अमानवी कृत्य करणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे, मात्र हा डॉक्टर कोणत्याही प्रकारचा अधिकारी नसून रेसिडेंट डॉक्टर आहे. अशा घटनेला ससूनचे अधीक्षक, विभाग प्रमुख हे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर आता नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Rashtra Sanchar:
whatsapp
line