Breaking News: लालबागमधील सगळ्यात मोठ्या इमारतीला आग, पाहा व्हिडीओ

मुंबई | Mumbai Fire News – मुंबईतील लोअर परळ येथील अविघ्न पार्कमध्ये (Avighna Park) गुरुवारी (15 डिसेंबर) सकाळी भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसंच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. घातपाताची कोणतीही माहिती निश्चित केली गेली नाही. पुढील माहितीची प्रतीक्षा असून आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मुंबईतील लालबाग परिसरातील वन अविघ्न ही गगनचुंबी इमारत आहे. ही इमारत एकूण 60 मजल्यांची आहे. या इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. तर अनेक बैठी घरं, चाळीही आहेत. ही इमारत मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या बाजूलाच आहे. तसंच अनेक नागरिक या भीषण आगीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लालबागमधील अविघ्न पार्क इमारतीमध्ये सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या 22 व्या मजल्यावर लागलेल्या आगीनंतर धुराचे लोट पसरले होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मागील वर्षीही अविघ्न इमारतीला आग लागली होती. 19 व्या मजल्यावर लागलेली ही आग विझवताना अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. या आगीनंतर मोठ्या इमारतींमधील सुरक्षा यंत्रणेसंबंधी प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, वर्षभरानंतर पुन्हा याच इमारतीत आग लागल्यानं पुन्हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Sumitra nalawade:

View Comments (0)