Anupam Kher | सध्या बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) चांगलेच चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे ते प्रेक्षकांसाठी मोठं गिफ्ट घेऊन आले आहेत. अनुपम खेर 21 हनुमान मंदिरांची ऐतिहासिक डॉक्युमेंटरी दाखवणार आहेत. यासाठी ते अयोध्येत (Ayodhya) दाखल झाले आहेत. सध्या त्यांचे अयोध्येतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनुपम खेर यांनी रामजन्मभूमी परिसराजवळील श्रीराम देवस्थान मंदिराचे दर्शने घेतले. यावेळी त्यांनी पूजा देखील केली. तसंच तिथल्या संत लोकांच्या भेटी घेतल्या. विशेष म्हणजे खेर यांनी संकटमोचन हनुमान यांची आठ मंदिरे आणि त्यांचे महत्त्व यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म लाँच केली आहे.
तर माध्यमांशी संवाद साधताना अनुपम खेर यांनी सांगितलं की, देवानं मला सर्व काही दिलं आहे. आज मी इथे काहीही मागायला आलो नसून देवाचे आभार मानायला आलो आहे. माझ्या आईचं स्वप्न आहे की मी अयोध्येला येऊन श्रीरामाचं दर्शन घ्यावं. तसंच राम मंदिरात रामाची मुर्ती बसवल्यानंतर मी माझ्या आईसोबत दर्शनासाठी येईन.
पुढे अनुपम खेर यांना कश्मीर फाइल्सवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, मी येथे 21 हनुमान मंदिरांबद्दल बोलण्यासाठी आलो आहे. तर कश्मीर फाइल्सवर बोलायचं झालं तर कश्मीर फाइल्सनं त्यांचं काम केलं आहे. 370 हटवल्यानंतर अनेक भागात तिरंगा फडकताना दिसत आहे.