मुंबई | Anupam Kher Shared A Funny Video With His Mother – बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर हे प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असतात. आता देखील अनुपम खेर यांनी त्यांच्या आईसोबतचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
अनुपम खेर यांचा भाऊ राजू खेर यांचा वाढदिवस होता. राजू यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम त्यांच्या कुटुंबीयांसह हॉटेलमध्ये पोहोचले. यादरम्यानचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम यांची आई जेवताना दिसत आहे. यावेळी अनुपम त्यांना विविध प्रश्न विचारत आहेत.
अनुपम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “आज राजू खेरच्या वाढदिवसादिवशी आम्ही एकत्र जेवण करत आहोत. तेव्हा मी माझ्या आईला विचारलं, तू काय पित आहेस? या प्रश्नावर तिनं दिलेलं उत्तर ऐकून मी घाबरलो. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल.”
दरम्यान, या व्हिडीओमध्ये “तू काय पित आहेस?” असं अनुपम त्यांच्या आईला विचारताना दिसत आहेत. यावर त्यांची आई म्हणते, “मी दारू पित आहे.” अगदी मजेशीर अंदाजामध्ये अनुपम यांची आई या व्हिडीओमध्ये गप्पा मारताना दिसत आहे.