मुंबई | Anurag Kashyap’s Revelation About Bollywood – बाॅलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्याच्या आगामी ‘दोबारा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट स्पॅनिश चित्रपट ‘Mirage’ चा रीमेक आहे. तसंच या चित्रपटासंदर्भात अनुरागनं दिलेल्या मुलाखतीत बाॅलिवूडवर देखील ताशेरे ओढले आहेत.
आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याच्या विषयावर मुकेश भट्ट यांनी काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये एकी नाही असं विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानावर अनुराग कश्यपनंही प्रतिक्रिया दिली आहे. अनुराग कश्यप म्हणाला,”आपली हिंदी इंडस्ट्री तशीच आहे, इथे एकी नाही. मी अनेकदा यामुळे खूप सहन केलं आहे”.
त्यानं एका प्रसंगाची आठवण करुन देत म्हणाला,”मी एकाची मदत करायला गेलो तेव्हा मला त्यापासून लांब राहण्यास सांगितलं गेलं होतं. मला सांगितलेलं, हा विषय तुझ्याशी संबंधित नाही, यात तू सहभाग घेऊ नकोस, तुझं तोंड बंद ठेव”, असा खळबळजनक खुलासा अनुरागनं केला आहे.