विराटचं वर्ल्डकपमध्ये पहिलं शतक आणि अनुष्काला आनंद, म्हणाली…

Anushka Sharma on Virat Kohli News : काल भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात विराट कोहलीने शानदार सेंच्युरी केली. विराटने ९७ रन्सवर असताना सिक्स मारुन त्याची सेंच्युरी पूर्ण केली. वर्ल्डकप २०२३ मध्ये विराटने झळकावलेलं हे पहिलं शतक.

विराटच्या प्रत्येक कामगिरीवर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम त्याला सपोर्ट करताना दिसते. विराटने बांग्लादेशविरुद्ध शतक झळकावल्यावर अनुष्काने त्याचं कौतुक केलंय. काय म्हणाली अनुष्का बघा.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विराट कोहलीचे एक पोस्टर शेअर केले टाकले. हेच पोस्टर सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे शेअर करण्यात आले होते.

बांग्लादेश विरुद्ध चालू असलेल्या विश्वचषक 2023 सामन्यात पहिले शतक झळकावणाऱ्या विराटचे हे पोस्टर अनुष्काने शेअर केले. या पोस्टरच्या वर अनुष्काने तिचा आनंद व्यक्त करण्यासाठी लाल हृदय आणि चुंबन घेणारा इमोजी शेअर केला. अशाप्रकारे अनुष्काने तिचा आनंद साजरा केलाय.

Prakash Harale: