“आयुष्यातला सर्वोत्कृष्ट सामना मी आज पाहिला, लव्ह यू विराट”; अनुष्काची भन्नाट पोस्ट व्हायरल

नवी दिल्ली : पाकिस्तान विरुद्धच्या टी २० वर्ल्ड कप सामन्यात किंग कोहलीने जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघाने विजय मिळवला. देशभरात एकीकडे दिवाळीला सुरुवात होत असतानाच भारतीय संघाने भारतीयांना फटाके फोडण्याची आणखी एक संधी दिली आहे. दरम्यान, या विजयाने सर्वत्र जल्लोषाचं वातावरण होतं.

सामना जिंकल्यानंतर अनुष्का शर्माने आपला पती किंग कोहलीला उद्देशून जबरदस्त पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट मध्ये ती म्हणाली की, ‘विराट तू जबरदस्त आहेस. सर्व देशवासीयांच्या आनंदात तू आज भर घातली आहेस. मला तुझा खूप अभिमान आहे. मी माझ्या आयुष्यातला सर्वात भारी सामना आज पाहिला आहे. सामना जिंकल्यानंतर मी मोठमोठ्याने ओरडत आणि डान्स करत उत्साह साजरा करत होते. आपली लहान मुलगी विचार करत असेल आई असं का करतेय. पण तिला मोठी झाली की लवकरच कळेल हा आनंद किती भन्नाट आहे. मागील काही दिवस तुझ्यासाठी वाईट होते. मात्र, आता तू पूर्वीपेक्षाही जास्त ताकतीने पुनरागमन केल आहेस. मला तुझा अभिमान आहे.

Dnyaneshwar: