घरचे कौतुक ऊर्जा देणारे : मुरलीधर मोहोळ

पुणे : पक्षाचा सरचिटणीस झाल्यानंतर अनेक सत्कार सोहळे झाले. परंतु, ज्या कोथरूडला मी कर्मभूमी मानतो त्या घरच्या लोकांनी केलेले हे कौतुक ऊर्जा देणारे आहे, असे भावनिक उद्गार भाजपा प्रदेशचे नवनिर्वाचित सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी काढले. बुधवारी भाजपाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार शुभंकरो लॉन्स येथे आयोजित करण्यात झाला. याला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे मनपा मा. सभागृहनेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मोहोळ यांनी आपल्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेतला. मागे वळून बघत असताना पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खूप काही दिले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सन्मान की निरोपाच सत्कार

आपल्या भाषणामध्ये मिस्किलपणे बोलताना मोहोळ यांनी, ‘ हा कौतुकाचा सोहळा आहे की, पुण्यातून निरोप देण्याचा सत्कार’ आहे असा चिमटा काढला. यावर आपल्या भाषणात ना. पाटील यांनी तुम्ही कितीही मोठे झाला तरी पुण्यातून तुमची सुट्टी नाही, पुण्याच्या राजकारणावर तुमचाच पगडा हवा, अशी स्पष्टोक्ती केली.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, व्यवहारातील लोकशाही असणारा हा पक्ष असून इतरांना मोठे करण्याची हिंदू संस्कृती आपण पाळतो. म्हणूनच मुरलीसारखा कार्यकर्ता जेव्हा मोठा होतो. तेव्हा आपल्याला आनंद होणे स्वाभाविक आहे. इतरांच्या मोठेपणामध्येच आपले सुख मानणारी संस्कृती या पक्षामध्ये रुजली आहे, असे असले तरीही भविष्य पाहणारी भाजपा पार्टी आहे. त्यामुळे झालेले सर्व सरचिटणीस हे युवक सरचिटणीस आहेत. त्यांना थेट प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे. महाराष्ट्राचे भविष्य ज्याच्यामध्ये आहे ते करणारा हा एकमेव पक्ष म्हणून आपली ओळख आहे. गणेश बिडकर यांनी देखील यावेळी आपले समयोचीत भाषण केले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

Nilam: