“भगवा रंग हा स्वामी विवेकानंदांचा…”, ‘गेरूआ’ वादावर अरिजित सिंह स्पष्टच बोलला

मुंबई | Arijit Singh On Gerua Song Controversy – बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंहने (Arijit Singh) त्याच्या अप्रतिम गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. सध्या अरिजित सिंह चांगलाच चर्चेत आहे. ‘कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022’ (Kolkata International Film Festival) मध्ये अरिजितनं शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘दिलवाले’ (Dilwale) या चित्रपटातील ‘रंग दे गेरुआ’ (Rang De Gerua) हे गाणं गायलं होतं. मात्र या गाण्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. तसंच त्याची पुढची कॉन्सर्टदेखील रद्द करण्यात आली. दरम्यान, आता अरिजितनं या ‘गेरुआ’ वादावर भाष्य केलं आहे.

18 फेब्रुवारीला कोलकाता येथे अरिजित सिंहची एक कॉन्सर्ट पार पडली. या कॉन्सर्टवेळी त्यानं ‘गेरुआ’ वादावर भाष्य केलं. यावेळी तो म्हणाला की, “एका रंगावरुन इतका वाद का? भगवा रंग हा संन्याशी लोकांचा रंग आहे. तसंच स्वामी विवेकानंद यांचा रंग आहे. जर त्यांनी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली असती तर त्यावरुन काही वाद झाला असता का?”, असा सवालही अरिजितनं उपस्थित केला आहे.

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावत अरिजितनं ‘गेरुआ’ हे गाणं गायलं त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिथे उपस्थित होत्या. त्यानंतर अरिजितची पुढची कॉन्सर्ट रद्द करण्यात आली होती. त्यावर भाजपनं आरोप केला होता की, भगव्या रंगाला ममताचं सरकार घाबरल्यानं पुढची कॉन्सर्ट रद्द करण्यात आली आहे. तर ही काॅन्सर्ट सुरक्षेच्या दृष्टीनं रद्द करण्यात आली असल्याचं ममता यांनी सांगितलं.

Sumitra nalawade: