अर्जुन कपूरने घेतला ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच समाचार; म्हणाला

मुंबई : बॉलिवूड मधील सर्वच अभिनेते आणि अभिनेत्रींया आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असल्याच पाहायला मिळत. हेल्दी डायट, व्यायाम, योगा आणि स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेत असतात. असाच बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आपल्या अभिनयाने सर्वांचाच वाढता अभिनेता म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या दीड वर्षापासून आपल्या फिटनेससाठी कष्ट घेताना दिसत आहे. वाढत्या वजनामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तर आता एका युजरने चक्क अर्जुनच्या फिटनेस ट्रेनरला सोशल मीडियावर मेसेज केला आहे. यामुळे अर्जुन चांगलाच भडकला आहे. त्याने आणि त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराने चांगलाच पोस्ट करणाऱ्या युजरचा समाचार घेतलं आहे.

सोशल मीडियावर अर्जुन कपूरच्या ट्रेनरला युजरने केलेल्या मेसेज मध्ये युजरने म्हटले आहे की, “तु एक नशिबवान ट्रेनर आहेस. अर्जुनसारख्या व्यक्तीला तू ट्रेन करत आहेस. तू फक्त पैसे कमवत राहा. बाकी अर्जुन हा कधीच आकर्षक शरीरयष्टी मिळवू शकणार नाही. तो एक श्रीमंत मुलगा आहे.” अशा शब्दात युजरने अर्जुनच्या ट्रेनरलावर मेसेज केले आहेत. त्यामुळे अर्जुन कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून त्याला सडेतोड शब्दात उत्तर दिल आहे.

अर्जुनने म्हटलं आहे की, “जो कोणी आहे त्याने समोरून वार करावेत. तुमच्यासारख्या लोकांसाठी शेपमध्ये राहणं हीच फिटनेस आहे. तुमच्यासारखी लोक आपली ओळख लपवून पाठीमागून वर करतात. मानसिक फिटनेसबाबत जर तुम्ही बोलत असाल तर मी समोरा-समोर प्रत्येक परिस्थितीला तोंड देतो.” अशा शब्दात अर्जुनने त्याला चांगलंच सुनावलं आहे. तसंच त्याची गर्लफ्रेंड मलायकाने देखील अर्जुनला पाठिंबा देत लिहलं आहे की, अर्जुन तू खरं बोललाआहेस. ट्रोलर्सला कधीच डोक्यावर चडू होऊ देऊ नकोस. तुझा पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी तुला अधिक ताकद मिळो. अशा शब्दात मलायकाने अर्जुनची साथ दिली आहे.

Nilam: