मोठी बातमी! उरीच्या जंगलात सैन्य दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

अनंतनाग | Anantnag – सध्या जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) अनंतनागमध्ये (Anantnag) भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आज या चकमकीचा चौथा दिवस आहे. तर सुरक्षा दलानं अतिरेक्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. अतिरेकी कोकरनाग जंगलात लपले आहेत त्यामुळे त्यांना हिसकावून लावण्यासाठी सुरक्षा दलाकडून ड्रोनद्वारे आणि रॉकेट लॉन्चरद्वारे बॉम्ब वर्षाव केला जात आहे. या बॉम्ब वर्षावामुळे अतिरेकी जीवमुठीत घेऊन पळ काढताना दिसत आहेत. अशातच आता बारामुल्लाहमधून मोठी बातमी समोर आली आहे. उरीच्या हथलंगा जंगलात सैन्य दलानं दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

याबाबतची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं माध्यमांशी बोलताना दिली. अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या दोन दहशतवाद्यांची अजून ओळख पटलेली नाहीये. तसंच दुसऱ्या दहशतवाद्याचा शोध सुरू होता, त्यानंतर त्यालाही संपवण्यात आलं. सुरक्षा पथकांची संयुक्त टीम ही संशयित स्थानावर पोहोचताच तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त टीमवर गोळीबार केला. त्यावेळी प्रत्युत्तरात सैन्याच्या जवानांनी गोळीबार करत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

दरम्यान, अनंतनागमध्ये अतिरेक्यांनी जंगलातील जमिनीत तळ निर्माण केला होता. त्यामुळे ते जमिनीत तळ ठोकून बसले होते. पण, सुरक्षा दलानं ड्रोनद्वारे बॉम्ब हल्ला करत अतिरेक्यांचे तळ उद्धवस्त केले आहेत. तसंच अतिरेक्यांचा नोमोनिशान मिटत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन सुरू राहणार असल्याचं भारतीय लष्करानं म्हटलं आहे.

Sumitra nalawade: