नवी दिल्ली : (Arvind Sawant On Eknath Shinde) मुळ पक्षाला वंदनीय हिंदूऱ्हदय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलं अन् आदरनीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली जो पक्ष आज कार्यरत आहे त्याच पक्षाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळायला हवं, असं मत शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं आहे. पुढे त्यांनी एका उदाहरणाचा दाखला देत ते म्हणाले, एकाद्या पक्षाचा एक आमदार आहे अन् तो इतर पक्षात गेला तर शंभर टक्के पक्ष त्याच्या बाजूने आहे असं समजायचं का? त्यामुळे किती आमदार-खासदार कोणाकडे आहेत आला काहीचं महत्त्व राहात नाही, आमच्याकडे राष्ट्रीय कार्यकारणी आणि कार्यकारणी सभा आहे त्यामुळे असं सावंत म्हणाले.
सावंत पुढे म्हणाले, आजपर्यंत निवडणूक आयोगासमोर वाद-विवाद झाले आहेत ते सर्व लेखी देण्यात आले आहेत. आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सभासद नोंदनी, मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. त्यामुळे मिंदे गटाकडून काय सादर केलं जातंय याला काहीचं महत्त्व नाही. हे सगळं एवढं सोपं आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळायला हवा असं मला वाटतंय.
शिंदे गटाने केलेल्या मागणीवर प्रश्न विचारण्यात आला की, आमदार आणि खासदार या लोकप्रतिनिधींची मत पक्षाची मान्यता देताना गृहीत धरली जातात. त्यामुळे आपल्या पक्ष देताना देखील हेच गृहीत धरावं? त्यावर सावंत म्हणाले, एखाद्या पक्षाचा एकच आमदार आहे आणि तो इतर पक्षात गेला तर, पुर्ण पक्ष त्याच्या पाठीमागे आहे असं समजायचं का? मग त्या पक्षाच्या प्रमुखाने आणि सदस्यांनी काय करायचं, मतदारांनी कोणाला मतदान केलं आहे यांना? नाही तर मतदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उभे राहिलेल्या उमेदवारांना मतदान केलं आहे. तुम्हाला व्यक्तीशः नाही मतदान केलं.