रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप

पंढरपूर VITTHAL-RUKMINI NEWS PANDHARPUR | रुक्मिणी मातेच्या चरणावर शनिवारी मध्यरात्री 12 ते 3 च्या दरम्यान औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे उप अधिक्षक श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वज्रलेप (Thunderbolt) करण्यात आला. दरम्यान रविवारी रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते.

रुक्मिणी मातेच्या चरणाची झीज झाल्यामुळे वज्रलेप करण्याबाबतचा प्रस्ताव पुरातत्व विभागाने दि. 7 व 8 मेच्या पाहणीवेळी दिला होता. त्यानुसार शनिवारी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे उप अधिक्षक श्रीकांत मिश्रा यांचे पथक पंढरपुरात दाखल झाले होते. शनिवारी मध्यरात्रीनंतर शेजारती झाल्यावर रुक्मिणीमातेच्या चरणावर वज्रलेप करण्यात आला. त्यामुळे रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन रविवारी बंद ठेवण्यात आले.

वज्रलेपानंतर चांदीच्या पादुकांचे कवच रुक्मिणी मातेच्या चरणावर ठेवण्यात आले होते. यापुढील काळात पुरातत्व विभाग ज्या सुचना देतील त्यांचे तंतोतंत पालन करण्यात येईल, असे मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

Dnyaneshwar: