“…आम्ही बघतोय हा माकडांचा तमाशा”; महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर ओवैसी

मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षातील आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यापासून महाराष्ट्रात सत्ताबदल होईल अशी चर्चा सुरु आहे. शिंदे समर्थक चार दिवसांपासून आसाम मधील गुवाहाटीत आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी त्यांची शिवसेना प्रमुखांकडून मागणी आहे. त्याविरुद्ध शिवसेनाप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री यांची महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं नाही अशी भूमिका आहे. त्यामुळं हे प्रकरण नेमकं किती दिवस लांबणार आहे आणि याचा निकाल काय लागणार आहे यावर राजकीय वर्तुळात क्रिया प्रतिक्रिया सुरु आहेत. दरम्यान एआयएमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्रात चाललेल्या घडामोडींकडे आमचं लक्ष आहे मात्र यावर मी काहीही भाष्य करणार नाही. हा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. ते यावर काय निर्णय घ्यायचा तो घेतील. महाराष्ट्राच्या राजकारणात आमची भूमिका मोठी असली तरी या प्रकरणात आम्हाला उडी घ्यायची नाही” असं एएनआयशी बोलताना ओवैसी म्हणाले.

“महाराष्ट्रातल्य राजकीय घडामोडींकडे आमचं लक्ष आहे. सध्या राज्यात माकडांचा खेळ सुरु आहे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर माकडं उद्या मारतात अशी परिस्थिती आहे. कोणीही एका झाडावर थांबत नाही. हा सगळा तमाशा आम्ही बघतोय” असा खोचक टोला ओवैसी यांनी मारला आहे.

Dnyaneshwar: