अंधेरी पोटनिवडणुकीसाठी थेट दिल्लीत प्लॅनिंग? बावनकुळे-शेलार अमित शाहांची गुप्तगू!

मुंबई : (Ashish Shelar And bavankule meet Amit Shah) तोंडावर येऊन ठेपलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच एखाद्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारसाठी ही पोटनिवडणूक जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दरम्यान, अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरण्याचे जवळपास निश्चित केलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अंधेरीतील ही लढाई शिवसेना आणि भाजपसाठी सेमीफायनल असणार आहे. त्यामुळे भाजपने कोणत्याही परिस्थितीत ही पोटनिवडणूक जिंकायची ठरवले असल्याने त्याप्रमाणे रणनिती आखण्यात येत आहे.

या पार्शभुमीवर राज्यातील नेत्यांनी आता थेट दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत गुप्तगू केली असल्याचे चर्चा आहे. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनी गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून, आता अंधेरी पोटनिवडणूकीच्या विधानसभेसाठी भाजपकडून दिल्लीत प्लॅनिंग करण्यात येत आहे.

Prakash Harale: