“…याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले”, आशिष शेलारांचं संजय राऊतांवर टीकास्त्र

मुंबई | Sanjay Raut – सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) जम्मू येथे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो यात्रेत’ (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले आहेत. यावरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले! याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची शकले उडाली.. “याच भल्या” कामाचा झेंडा तुम्ही घेऊन निघालाच आहात तर तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची!”

तसंच “हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा मा. संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत बसून होते. 370 कलम मुक्त काश्मीर व्हावे यासाठी असंख्य जण संघर्ष करीत होते, बलिदान देत होते, तेव्हा संजय राऊत मुंबईत बसून मीडियात “ध्वनी प्रदूषण” करीत होते”, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

Sumitra nalawade: