पाकिस्तानला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर, भारतासाठी ‘सोने में सुहागा’

कोलंबो : (Asia Cup 2023 India vs Pakistan, Haris Rauf) मुसळधार पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला उशिरा सुरुवात झाली आहे. पण राखीव दिवशी सामना सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तानला धक्का बसलाय. वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजीमध्ये कमतरता भासणार असून, अन् त्याचा फायदा भारतीय गोलंदाज घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

दरम्यान, आज हॅरिस रौफ गोलंदाजी करु शकणार नाही. टीम इंडियासाठी ही बाब म्हणजे ‘सोने में सुहागा’ आहे. हॅरिस रौफ याला रविवारी दुखापत झाली होती. त्याचा एमआरआय काढण्यात आला. तो नॉर्मल आला, पण खबरदारी म्हणून हॅरिस रौफ आज गोलंदाजी करणार नाही. हॅरिस रौफ डॉक्टरांच्या निगरानीखाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हॅरिस रौफ आज गोलंदाजी करणार नाही.

रविवारी हॅरिस रौफ याने दमदार गोलंदाजी करत पाच षटकात केवळ 27 धावा खर्च केल्या होत्या. हॅरिस रौफच्या अनुपस्थितीचा फटका बाबर आझम याला बसण्याची शक्यता आहे. डेथ ओव्हरमध्ये हॅरिस रौफ भेदक मारा करण्यात तरबेज आहे. त्याच्या जागेवर कोण गोलंदाजी करणार हा महत्त्वाचा प्रश्न बाबरपुढे असणार आहे. त्यामुळे हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Prakash Harale: