Asian Games 2023 India vs Nepal : सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत नेपाळच्या संघाला 23 धावांनी धूळ चारत भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय साध्य करत भारतीय फलंदाजांनी 20 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 202 धावांचा डोंगर नेपाळच्या संघापुढे उभा केला.
दरम्यान, भारताच्या 202 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेपाळ संघाने भारताल कडवी झुंज दिली मात्र, त्यात त्यांना यश मिळवता आले नाही. त्यांना 179 धावांमध्ये रोखण्यात भारतील गोलंदाज यशस्वी ठरले. भारताकडून यशस्वी जयस्वाल याने शतकी खेळी केली. तर गोलंदाजीत रवि बिश्नोई याने तीन विकेट घेतल्या. त्यामुळे भारताचा यशस्वी खेळीने विजय सुकर झाला.
भारताकडून रवि बिश्नोई याने 4 षटकात 24 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंह आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंह याने 4 षटकात 43 धावा खर्च केल्या. आवेश खान याने 4 षटकात 32 धावा दिल्या. साई किशोर याने 4 षटकात 25 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. वॉशिंगटन सुंदर याने एका षटकात 11 धावा खर्च केल्या. तर शिवम दुबे याने तीन षटकात 37 धावा खर्च केल्या.