“मी टीपू सुलतानचं नाव घेणार, काय करता ते बघतोच”; भाजप नेत्याच्या वादग्रस्त विधानानंतर ओवैसींचा सरकारवर हल्लाबोल

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये टीका टीप्पणी सुरू आहे. अशातच भाजपा नेते नलीनकुमार कतील (Nalin Kumar Kateel) यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. टीपू सुलतानच्या समर्थकांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या विषयात आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे.

असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले?

यासंदर्भात बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, मी टीपू सुलतानचं नाव वारंवार घेईन, तुम्ही काय करता ते बघतोच, अशा परखड भाषेत असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारला प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कर्नाटक भाजपा अध्यक्षांच्या विधानाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहे का ? भाजपा कतील यांच्यावर कारवाई करणार का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याबरोबरच कतील यांचं विधान हिंसा आणि नरसंहार घडवण्यसाठी प्रोत्साहन देणारं आहे, असेही ते म्हणाले.

Dnyaneshwar: