एक तरी ओवी अनुभवावी

कोणत्याही शासकिय सेवेत कर्मचारी जास्तीतजास्त साठ वर्षेपर्यंत काम करतो.नंतर तो कर्मचारी सेवानिवृत्त होतो.म्हणून आपल्या लोककथेचा शेवट “साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सफळ संपूर्ण ” असा केला जात असे आपले जीवन कृतकृत्य करावे असा सल्ला माऊली देतात.
म्हणे पाहे हे येईल!
आणि आतांचे भोगिता जाईल!
मग काय उरेल! हितालागीं!!५७६!!
म्हणोनि नाइकणे पावे!
तवं आउकोनि घालीं आघवे!
पंगु न होता जावे!तेथ जाय!!५७७!!
दिठी जव जाये!तव पाहावें तेतुले पाहे!
मुकत्वा आधी वाचा वाहे! सुभाषितें!!५७८!!
हात होती खुळे!हे पुढील मोटके कळे!
आणि करुनि घाली सकळे!
दानादिके!!५७९!!

तेंव्हा ऐसी दशा येईल पुढे!ते मन होईल वेडे! तवं चिंतूनि ठेवी चोखडे!आत्मज्ञान!! ५८०!!
चोर पाहे झोंबती! तवं आजीचि रुसिजे संपत्ती! का झाकाझाकी वाती!
न वचता कीजे!!५८१!!
तैसे वार्धक्य यावे!मग जे वायां जावे!
ते आताची आघवे!सवते केले!!५८२!
आता मोडूनि ठेली दुर्गे!कां वाळित खगे!
तेथ उपेंक्षूनि जो रिगे!तो नागवला की!!५८३!!
तैसे वृध्दाप्य होय!आलेपणे वाया जाये!
जे शतवृध्द आहे!नेणो कैंचा!!५८४!!

झाडली कोळे झाडी! तया न फळे जेवी बोंडी! जाहला अग्नी राखोंडी!
जाळील कायी!!५८५!!

म्हणोनि वृध्दाप्याचेनि आठवे! वृध्दाप्या जो नागवे! तयांचा ठायीं जाणावें!ज्ञान आहे!!५८६!!
तैसेनि नाना रोग!पडिघाती पुढा आंग!
तव आरोग्याचे उपेग!करूनि घाली!!५८७!!
सापांचा तोंडी!पडिले जे उंडी! ते लाऊनी सांडी!प्रबुध्दु जैसा!!५८८!
तैसा वियोग जेणे दु:खे!विपत्ती शोके पोखे!
ते स्नेह सांडूनि सुखे!उदासु होये!!५८९!!
आणि जेणे जेणे कडे!दोष सूतील तोंडे!
तया कर्मरंध्रा गुंडे!नियमांचे दाटे!!५९०!!
ऐस ऐसिया आईती!जयाची परी असती!
तोचि ज्ञान संपत्ती-!गोसावी गा!!५९१!!
आता आणीकही एक !लक्षण अलौकिक!
सांगेन आइक !धनंजया!!५९२!!
वार्धक्यातील विवेक-ओ.५७६ते५९२-

भावार्थ-आपले तारुण्या प्रमाणे बेधुंतेने म्हातारपण व्यतित करु नये.हे मुमुक्षुंना समजते.तरुण पणीच संयम विवेक बाळगणे स्वहितासाठी उपयुक्त आहे. म्हणून कान जो पर्यंत बहिरे होत नाहीत तो पर्यंत सदपुरूषांचे उपदेश,प्रवचने,किर्तनांचे तो श्रवण करतो.पाय शाबूद आहेत तो पर्यंत तीर्थाटने करतो. नजर चांगली आहे तेंव्हाच तो देवदर्शन घेतो.जो पर्यंत वाणी बोबडी होत नाही तो पर्यंत प्रार्थना, स्तोत्र पठण करतो. लुळी पांगळी अवस्था होई पर्यंत उत्तम चिंतन ध्यान धारणा करुन आत्मज्ञानाप्रत पोहचण्याचा प्रयत्न करतो.घरात चोर येणार समजल्यावर माझ्या वस्तु वगैरे प्रेम संपते “सर सलामत तो पगडी पचास” कळते.तसे संग्राहकता कमी करणे सूर्यास्त होण्या आधी स्वयंपाक घरातील वस्तु झाकण्याचा प्रघात असे तसे यम दारात उभा राहायचे आता ज्ञानी माणसे यमाचे आपणहुन स्वागत करतात.

-प्रकाश पागनीस

Nilam: