एक तरी ओवी अनुभवावी

प्रकाश पागनीस

।।जय श्री राम ।।
।।ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन ।।
।।अ.१३वा. “अंतरची धावे
स्वभावे बाहेरी ।।

भगवद्गीतेत सांगितले आहे.
मन एव मनुष्याणाम्‌‍‍ कारणं बंध
मोक्षये ।।
मनाच्या बऱ्यावाईट संकल्पातून पाप-पुण्यकर्मे घडत राहतात.
तैसे मन हे पांडवा । मूळ यया इंद्रीयभावा ।
हेचि राहटे आघवा । द्वारी इही ।।३०२।।
हे अर्जुना, आतापर्यंतच्या निरुपणातून तुझ्या लक्षात आले असेल इंद्रिंयांकडून घडणाऱ्या कर्मांचे मूळ मनच आहे. त्याचे प्रेरणेने शरीराकडून कार्ये केली जातात.
परि जिये वेळी जैसे । जे होऊनि आंतु असे ।
बाहेरी ये तैसे । व्यापारुपे ।।३०३।।
जसा विचार मनात येईल तसे कर्म हातून घडते.
यालागी साचोकारे । मनी अहिंसा थांवे थोरे ।
पिकली द्रुती आदरे । बोभात निघे ।।३०४।।
म्हणून एक सत्यकथन केले जाते. मनात अहिंसात्मक विचार असतात म्हणून दयावंत स्वभावाचे दर्शन होते. जसे फळ पिकले कळीचे फूल झाले तर परिमल दूरवर पसरतो.
म्हणोनि इंद्रिये तेचि संपदा। वेचिताही उदावादा।
अहिंसेचा धंदा । करिते आहाती ।।३०५।।
म्हणूनच अहिंसारूपी दैवीसंपतीचे जोरावर दया आणि करुणा यांचा सदाचार चालतो.
समुद्री दाटे भरिते । ते समुद्रचि भरी तरीयाते ।
तैसे स्वसंपत्ती चित्ते । इंद्रियां केले ।।३०७।।
ज्याप्रमाणे सागराला भरती आल्यानंतर सागर भरतीचे पाण्याने खाड्या भरून टाकतो. त्याप्रमाणे अहिंसा चित्तात भरली जाते. इंद्रियांचे कडून सद्‌‍कर्माचे पालन केले जाते.
हे बहु असो पंडितु । धरोनि बाळकाचा हातु ।
ओळी लिही व्यक्तु । आपणचि ।।३०७।।
इतकेच काय पूर्वी एकदम बालवाडीत जाणाऱ्या बाळाकडून गुरुजी “श्रीगणेश”हा शब्द. लिहून घेताना मुलाचे बोट पकडून गुरुजीच लिहीत असत. तसे मनाच्या आज्ञेने शरीर काम करीत असते.
तैसे दयालुत्व आपुले । मने हातापाया आणिले ।
मग तेथ उपजविले ।अहिंसेते ।।३०८।।
मनात दया आली, दान करावे पाऊलांनी मंदिराचे दारात नेले हातांनी गरिबांना दान देण्याचे काम केले.
या कारणे किरीटी । इंद्रियांचिया गोठी ।
मनाचिया राहटी । रूप केले ।।३०९।।
यासाठी हे अर्जुना तुला समजावे म्हणून अहिंसावादाचे, वागण्याचे मी वर्णन केले आहे.
ऐसा मने देहे वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।
जाहला ठायी जयाचा । देखशिल ।।३१०।।
म्हणून संन्यासी काया, वाचा मनाने कसे अहिंसेचे पालन करतो हे तुला पाहता येईल.
तो जाण वेल्हाळ । ज्ञानाचे वेळाउळ ।
हे असो निखळ । ज्ञानचि तो ।।३११।।
हे अर्जुना ग्रंथात अहिंसाची जी व्याख्या दिली आहे. असा तो अहिंसावादी अहिंसारूपी मंदिर आहे.
अहिंंसावादीचे वर्णन ओव्या वाचताना हिंंदी चित्रपट काजल मधील गाणे आठवले
।।तोरा मन दर्पन कहेलाये । भले बुरे सारे करमोंको । देखे और दिखाये ।।

Prakash Harale: