एक तरी ओवी अनुभवावी

विवेचन | प्रकाश पागनीस

अहिंसेविषयी माऊली सूक्ष्म विचार केल्याने ओव्यांची संख्या वाढली आहे. इथे पाहणारा ज्ञानी, कर्मयोगी आहे. हे लक्षात घेतले तर माऊलींविषयी अधिक प्रेम वाटते. बोटे, नाक झडलेला कुष्ठरोगी सगळेच पाहतात. पण एखादेच बाबा आमटे कुष्ठरोगींसाठी मोठा प्रकल्प सुरू करतात. आजच्या ओवींमधून आपण पाहण्यातील ममता कृपा पाहू
ओवी क्रमांक २७१ ते २७७-

आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु ।
हे संन्यासीले अवगुणु ।
जिया वाचा ॥२७१॥

हट्ट, आवेश, कपट, हव्यास, संशयास्पद वागणूक, आणि फसवेगिरी या सहा दोषांना तो काढून टाकतो आणि सद्विचारांना तो स्वीकारतो.

भूतीं वस्तू आहे । तिये रुपो शके विपाये ।
म्हणोनि वास न पाहे । बहुते करूनि ॥२७३॥

सर्व सजीवाचे अंतरंगातील देवाचे चैतन्य त्याला माहिती असल्याने तो कोणालाही दुखवित नाही

ऐसाही कोणे एके वेळे । आतुली कृपेचेनि सळे ।
उघडोनि डोळे । दिठी घाली ॥२७४॥

परमेश्वर सर्वांच्या अंतरंगात आहे, हे समजल्याने जगताकडे कृपेच्या नजने पाहतो.

तरि चंद्रबिंबौनि धारा । निघता नव्हती गोचरा ।
परि एकस चकोरां । निघती दोंदे ॥२७५॥

पौर्णिमेचे चंद्रकिरणातून. अमृतधारांचा वर्षाव होतो. या अमृतधारा सगळ्यांना दिसत नाहीत. चकोर या अमृताचे प्राशन करून शरीराचे सामर्थ्य वाढवतो.

तैसे प्राणियांसि होय । जरी तो वास पाहे ।
तया अवलोकनाची सोये । कुर्मीही नेणे ॥२७६॥

चकोर गुणग्राहक असतो. तसा अहिंसावादी दयाळू असतो. त्यांचे नजतील प्रेम, दयाभाव पिलांची वाढ केवळ नजने करणार्‍या कासविणीपेक्षा प्रेमळ नजर त्याला मिळालेली असते.

कि ऐसी । दिठी जयाची भूतांसी ।
करही देखसि । तैसेचि ते ॥२७७॥

तो प्रेमळ नजने पाहतो इतके शाब्दिक प्रेम कामाचे नसते प्रेम आणि ज्ञानाला कर्माची जोड द्यावी लागते. म्हणून माऊली म्हणतात, अहिंसात्मकाचे चालणे-बोलणे आपण पाहिले आता त्याचे हात पाहा, म्हणजे तो निष्कामयोगाने कर्म कसे करतो ते आपण पाहणार आहोत. कृतिशून्य बोलण्याला अर्थ नाही. तुकाराममहाराज म्हणतात –

बोलाचीच कढी बोलाचाचि भात । जेऊनिया तृप्त कोण झाला ॥
आधी कार्य करा मग यशाची वाट पाहा

चालण्याने ध्येय काढणे. पाहण्यात निकोपता आणणे या अहिंसावादीचे विचार आपण पाहिले उद्यापासून आपण अहिंसावादी आणि कर्मयोग यासंबंधी निरुपण करणार आहोत.

॥ अधिक देखणे जरी निरंजन पाहणे ।
योगीराज विनवणे मना आले वो माये ॥

Dnyaneshwar: