हडपसर : वानवडी, महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने क्रीडा आणि कला, कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध लोकांचा सन्मान करण्यात आला. देशातील विविध भागांतून वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणार्या लोकांचा सन्मान करण्यात आला.
भारतीय सैनिक अहोरात्र देशसेवा देतात, त्यामुळेच आपण सुरक्षित वातावरणात जगत आहोत. आयुष्यभर समर्पित भावनेने काम करून देशासाठी बलिदान देणार्या शहिदांना अटल अॅवॉर्ड देण्यात आले. ज्या जवानांनी देशहिताला प्राधान्य दिले, त्यांच्या पत्नींचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. भारतीय सैनिकांना प्रेरणा देणारे देशाचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहतो. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रावीण्य मिळवले अशा तरुण, युवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील योगदानाबद्दल अटल अॅवॉर्ड देण्यात आला.
रिटायर्ड एअर मार्शल भूषण गोखले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘मी भाग्यवान आहे. कारण अटलबिहारी वाजपेयी यांची आणि माझी चारवेळा भेट झाली. भारतीय सशस्त्र सेनेमध्ये काम केल्याने हा सन्मान मिळाला. हा अॅवॉर्ड माझ्यासाठी नसून इंडियन फोर्ससाठी आहे.’ याप्रसंगी इकबाल दरबार, दिलीप यादव, सना खान, प्रोफेसर रमया नायर, स्मिता कटवे, अपूर्व देशमुख, कुणाल गोसावी आणि किशोर खैरनार उपस्थित होते. यावेळी दोन वीर जवान शहीदांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आलोै.