आथिया शेट्टी आणि के एल राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात

मुंबई : काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाहसोहळा पार पडला असून आता आथिया शेट्टी आणि के एल राहुल लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं आणि उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

नुकतंच अथिया आणि के एल राहुल ‘तडप’ सिनेमाच्या प्रीमिअर दरम्यान एकत्र स्पॉट झाले होते. वृत्तानुसार, अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्याची सुनील शेट्टींनी तयारी सुरू केली आहे. तसंच पंचतारिका हॅाटेलमध्ये आथिया आणि राहुलचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

अथिया आणि के एल राहुल यांचा शाही विवाह सोहळा होणार आहे. या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपती हजेरी लावणार आहेत. तसंच अथिया आणि राहुल यांचं लग्न दाक्षिणात्य परंपरेनुसार होणार आहे. 

Sumitra nalawade: