‘मविआ’मध्ये वादाची ठिणगी! शिवसेनेच्या ‘त्या’ टीकेली काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “आघाडीच्या धर्माला…”

मुंबई : (Atul Londhe On Sanjay Raut) नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर पुढचा पेच प्रसंग टाळता आला असता, अशी भूमिका शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मांडण्यात आली होती. यावर काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत प्रतिक्रिया दिली.

लोंढे म्हणाले, नाना पटोले यांनी तडकाफडकी किंवा घाईने हा निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा. काँग्रेस पक्षात एक निर्णय प्रक्रिया आहे. त्यानुसारच निर्णय घेतले जातात. पक्षाध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की पक्षातील सर्वजण त्याचा मान राखतात व त्यानुसार त्याची अंमलबजावणीही केली जाते. सोनिया गांधी यांनी त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून पक्षहितासाठी घेतलेला तो निर्णय होता, असेही ते म्हणाले.

पटोलेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकटाची मालिका सुरु झाली. या आरोपात काहीही अर्थ नाही. जर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी कायम असते, तर पुढचा प्रसंग टळला असता. या ‘जर-तर’ ला राजकारणात काहीच अर्थच नसतो. पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळेच मविआ सरकार अडचणीत आले असे म्हणणे योग्य नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली, त्यामुळे यानिमित्ताने महाविकास आघाडीत वादीची ठिणगी पडली तर नाही ना अशा शंका निर्मान केल्या जात आहेत.

Prakash Harale: