‘…औरंगाबादचे पोलीस आयुक्त आजच राज ठाकरेंवर कारवाई करतील’; पोलीस महासंचालकांची माहिती

मुंबई : “राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त तपास करुन आवश्यक कारवाई आजच करतील. कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे,” अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेठ बोलत होते. तसंच राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी रजनीश सेठ म्हणाले, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेच्या भाषणाचा पोलीस आयुक्तांनी अभ्यास केला आहे. आवश्यक वाटल्यास पोलीस आयुक्त आजच राज ठाकरेंवर कारवाई करतील.

“कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेतल्यास कारवाई केली जाईल. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू नका, असं आवाहन पोलीस महासंचालकांनी केलं. ते पुढे म्हणाले की,”कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज आहे. सीआरपीएफच्या 87 कंपनी आणि 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर आहेत.” असंही सेठ म्हणाले.

Sumitra nalawade: