मुंबई | Avadhoot Gupte | मराठी सिनेसृष्टीचा प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक म्हणून अवधूत गुप्तेला (Avadhoot Gupte) ओळखलं जातं. त्यानं त्याच्या अफलातून गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. त्याचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. तसंच अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) नेहमी काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तसंच आता देखील तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्यानं नुकतीच राजकारणातील (Politics) प्रवेशाबाबत मोठी घोषणा केली आहे.
‘महाराष्ट्र टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अवधूत गुप्तेनं (Avadhoot Gupte) त्याच्या राजकारणातील प्रवेशाबाबत घोषणा केली आहे. “कोणतीही निवडणूक आली की मला विचारणा होतेच. त्यामुळे आता मी राजकारणात प्रवेश करणार आहे हे आत्ताच जाहीर करुन टाकतो. राजकारणात कशासाठी यायचं किंवा राजकारण कोण चांगलं करु शकतं? स्वत:चं पोट भरायची ज्यांना भ्रांत नाही, तोच चांगलं राजकारण करु शकतो. जेव्हा संसार आणि कुटुंबाप्रती असलेल्या जबबादाऱ्या संपतील, जेव्हा काही मिळवायचं किंवा काही गमवायचं नाही त्यावेळी मी राजकारणात येईन”, असं अवधूत गुप्तेनं म्हटलं आहे.
पुढे तो म्हणाला की, “मी हे सगळं 2019 च्या आमदारकीपासून पाहतोय. मला खात्री आहे की, समाजकार्यासाठी म्हणून मी राजकारणात येईन. मी राजकारणासाठी प्रामाणिकपणे पाच वर्ष देईन. जसं आपण आपलं घर साफ करतो, तसं प्रत्येकानं आपली छोटीशी चौकट काही काळापुरती प्रामाणिकपणे साफ केली तर भारत बदलायला वेळ लागणार नाही. तसंच ज्या दिवशी मी येईन त्या दिवशी जाण्याचीही तारीख जाहीर करेन”, असंही अवधूत गुप्त म्हणाला.