१० कोटी लोकांसाठी जनजागृती मोहीम; जागतिक हृदयदिनानिमित्त ग्लेनमार्कतर्फे उपक्रम

mpsc students 1mpsc students 1

पुणे : भारतातील अग्रणी फार्मास्युटिकल्स कंपनी ग्लेनमार्कतर्फे शहरातील औंध येथील मेडिपॉईंट हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल, मायमर हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, सुब्रमण्यम क्लिनिक, जोशी हॉस्पिटल आणि विजया नर्सिंग यांच्या सहयोगाने जागतिक हृदयदिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी उच्च रक्तदाब जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उच्च रक्तदाब हा हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाच्या आजारासाठी सर्वात मोठा धोका घटक आहे. भारतातील प्रत्येक तिसरा प्रौढ हायपरटेन्शन- उच्च रक्तदाब या आजाराने ग्रस्त आहे.

या प्रसंगी शहरातील विविध ठिकाणी नागरिक, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, ग्लेनमार्कने साकारलेल्या जगातील पहिल्या हायपरटेन्शन अवेअरनेस चिन्हाचे अनावरण करण्यात आले. वाढत्या उच्च रक्तदाबाच्या आजारांबद्दल आणि त्या संदर्भात वेळेवर योग्य तपासणीच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतातील ५०,००० आघाडीच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून हे चिन्ह विकसित केले असून एपीआय आणि हायपरटेन्शन सोसायटी ऑफ इंडियाद्वारे समर्थित करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर शहरात विविध ठिकाणी उच्च रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

ग्लेनमार्कने जागतिक हृदयदिन महिन्यानिमित्त सप्टेंबर महिन्यात भारतातील प्रमुख शहरे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, दिल्ली, कोलकत्ता , हैदराबाद या ठिकाणी रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. या देशव्यापी रॅलींमध्ये उच्च रक्तदाब, त्याची चिन्हे आणि लक्षणे याबद्दल जागरूकता पसरवण्यावर भर देण्यात आला. आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात उच्च रक्तदाब तपासणी शिबिर घेण्यात आली . हायपरटेन्शन उपचार क्षेत्रात आघाडीवर असल्याने, ग्लेनमार्कने या महिन्यात ३०० उच्च रक्तदाब जनजागृती रॅली आणि ८००० हून अधिक उच्च रक्तदाब तपासणी शिबिरे आयोजित करून १० कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशभरातील विविध रुग्णालयांच्या सहकार्याने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डिजिटल प्लॅटफॉर्मसह अनेक माध्यमांद्वारे २०० दशलक्ष हून अधिक भारतीय प्रौढांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

ग्लेनमार्कचे ग्रुप उपाध्यक्ष आणि इंडिया फॉर्म्युलेशनचे प्रमुख आलोक मलिक म्हणाले की हा उपक्रम देशात उच्च रक्तदाबाविषयी जागरूकता निर्माण करण्याबाबतचा आमचा प्रयत्न आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर रोगांसाठी प्रचलित जोखीम घटक असूनही बहुतेक रुग्णांना या स्थितीबद्दल माहिती नसते. हायपरटेन्शन व्यवस्थापनातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून, ग्लेनमार्क दरवर्षी लाखो लोकांना प्रभावित करणार्‍या या रोगाविरुद्ध देशाच्या लढ्यात प्रत्येक संभाव्य पाऊल उचलण्यासाठी वचनबद्ध आहे.

Dnyaneshwar:
whatsapp
line